सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत मिशन या दोनही संकल्पना लोकसभागातून प्रशासनाच्या वतीने यशस्वीपणे राबवण्यात येतील नागरिकांमधूनही चांगल्या संकल्पना आम्ही नक्की घेऊ सेवाभावी संस्था नी यासाठी पुढे यावे त्यांच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. काल महापालिकेच्या मंगलधाम इमारतीमध्ये तातडीची सर्व विभागांची बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये या दोनही संकल्पना संदर्भात त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शक सूचना दिल्या. उपायुक्त वैभव साबळे यांनी अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबत सविस्तर माहिती दिली. हे अभियान यशस्वी होण्यासाठी विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत त्यानुसार वेळेचे नियोजन होईल आणि वेळेमध्ये हे अभियान पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा या अभियानाचा एक भाग म्हणून २५००० पेक्षाही जास्त विविध प्रकारची फळझाडे फुलझाडे महापालिका क्षेत्रामध्ये लोकसहभागातून लावण्याचे उद्दिष्ट आहे. तीनही शहरामधील खुल्या जागा दुभाजक रस्ता कडेला असलेल्या रिकाम्या जागा वृक्ष लागवडीसाठी उपयोगात आणल्या जातील. उद्यान विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्या मध्ये बिया ते झाड ही संकल्पना यशस्वी करण्यात येणार आहे, सिड बॉल , असे अनेक उपक्रम वृक्षारोपण साठी संस्था ,सामाजिक कार्यकर्ते, शाळा , नागरिक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. रेन हार्वेस्टिंग ,वर्मी कंपोस्ट , होम कंपोस्ट, सोलर ( सौर ऊर्जा)सांडपाण्याच्या निचरा , या ५ बाबी पैकी ३बाबी आपल्या घरामध्ये पूर्ण करून घरपट्टी बिलामध्ये मध्ये ४% सवलत मिळणार आहे. या वेळी नागरिकांनी ही नामी संधीचा लाभ घेऊन घरपट्टी मध्ये सवलत मिळवून घ्यावी आणि माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशनचा एक प्रमुख उद्देश पूर्ण करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन या वेळी अति आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे. टाकाऊ पासून टिकाऊ या सकल्पातून मनपा क्षेत्रात काही ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे, या मध्ये नवं कल्पना साकारणाऱ्या कलालकरांनी आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटे यांच्याशी संपर्क साधावा , जेणे करून शहरातील तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, माझी वसुंधरा व स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या वेळी चागले प्रयन्त करून अवल नंबर प्राप्त करायचा आहे ,असे यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post