प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाड
राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण महोत्सव अंतर्गत पीएम श्री प्रशाला पानवडोद मध्ये आज आत्मविश्वासातून व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उदघाटन तंटामुक्ती चे अध्यक्ष विकास दौड यांचे हस्ते व रवी आण्णा दौड, भास्कर फुसे, लक्ष्मण रानगोते, नाना गावंडे शालेय अध्यक्ष पांडुरंग दौड यांचे प्रमुख उपस्थितीत झाले. प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य सुनील सपकाळ, उपक्रमशील शिक्षक कृष्णा जैस्वाल व नरेंद्र दौड यांनी विदयार्थ्यांना आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करून स्वतः चे व्यक्तिमत्व घडवावे असा सल्ला दिला. जेष्ठ शिक्षक भास्कर पाटील, शहाबुद्दीन शेख, विजया चापे, श्रीमती बी ए मानकर , डी के सपकाळ यांनी कार्यशाळा यशस्वी करणेसाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शिक्षिका निशिगंधा दलाल यांनी केले तर आभार अमोल कालभीले यांनी मानले. सूत्रसंचालन जमील शेख यांनी केले.
Discussion about this post