✒ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒
संपर्क📲 9423170716
पोलिस उपठाणे कसनसुर येथे पोलिस रेंझींग डे दिनानिमित्त प्रभारी अधिकारी धिंरसीग वसावे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक वृंद यांनी गावात जन जागृती रॅली काढून दारूबंदी, व्यसन, अंधश्रद्धा, कर्मकांड,व समाजातील सर्व वाईट अनिष्ट चालीरीती बाबत जागृती करीत कसंनसुर गावात रॉली काढून जागृती केली. उप पोलीस कसंनसुर अधिकारी व अंमलदार तसेच त्यानंतर पोस्टात शस्त्र प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित करून शस्त्र बाबत माहिती दिली. तसेच ठाणे दैनंदिन कामकाज व पोलीस स्टेशनचा एकूणच कारभार कसा चालतो याविषयी ठाणे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच शिक्षक वृंद यांना पोलीस स्टेशनचे कारभार कसा चालतो याविषयी माहिती देण्यात आली.
तसेच प्रभारी वसावे यांनी अधिकारी कार्यालय,मोहरर कक्ष, स्टेशन डायरी कक्ष, बानिऺशी विभाग,डिएसबी विभाग, वायरलेस संच इत्यादी बाबतीतही संबंधित विभागाचे अंमलदार याबाबत माहिती दिली. तसेच सायबर क्राईम, पॉक्सो कायदा, Good touch, Bad touch तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम बद्दल पोलिस उपनिरीक्षक बाबुलाल बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात १३० ते १४० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. उपस्थितांना चहा, बिस्किटे व अल्पोपहार व्यवस्था पोस्टमार्फत करण्यात आले.
Discussion about this post