अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ; बीएसएनएल टॉवरला नेटवर्क नसल्याने ग्राहक त्रस्त…
बीएसएनएल टॉवर बनले शोभेची वस्तू..
प्रतिनिधी | भवन – चेतन लोखंडे..
सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात दिवसेंदिवस तासनतास वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला भवन गावातील गावातील नागरिक आधीच हैराण आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे भवन परिसरातील नागरिकांना आणखी वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागते आहे.
तसेच भवन गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करत आहे.परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट केलाय.त्या देखील मोबाईल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व्यापारी व शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. संबंधित मोबाईल कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भवन ग्रामस्थ करीत आहे.
भवन परिसरात सुमारे बाराशेहून अधिक बीएसएनएल कंपनीचे ग्राहक असताना देखील कंपनीकडून ग्राहकांचा विचार न करता अतिशय सुमार दर्जाची सेवा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.भवन येथील बीएसएनएल टॉवर्स असलेल्या ठिकाणी बॅटरीचा बॅकअप नसल्याने विज जाताच नेटवर्क जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
…………………………………………….
कोट ; लक्ष्मण जिवरग, बीएसएनएल ग्राहक,भवन.
भवन गावात मोठ्या प्रमाणावर बीएसएनएलचे ग्राहक आहे.गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भवन गावात विज जाताच बीएसएनएलचे नेटवर्क देखील मोठ्या प्रमाणावर बंद होत आहे.वीज गेल्याबरोबर बीएसएनएल रेंज बंद पडते.त्याचबरोबर इंटरनेट सेवा पूर्ण बंद पडून कमी नेटवर्क मुळे आवाज न येणे, कॉल मध्येच कट होणे, कॉल न लागणे, अशा समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे.
बीएसएनएल कंपनीचे कनिष्ठ दूरसंचार अधिकारी सदानंद पतंगे यांना फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद येत आहे व ते याकडे दुर्लक्ष करीत आहे,येत्या आठवड्याभरात सुधारणा न झाल्यास भवन गावातील बीएसएनएल टॉवर असलेल्या ठिकाणी ग्राहकांना घेऊन आंदोलन केले जाईल – लक्ष्मण जिवरग, बीएसएनएल ग्राहक,भवन.
Discussion about this post