प्रतिनिधि :- शेख मोईन.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (लाडका भाऊ योजने अंतर्गत) काम करणाऱ्या निधीयुक्त युवा कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्या पासुन मानधन मिळाले नाहीत, युवा कर्मचारी यांना मानधना अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान किनवट /माहुरचे आमदार भिमराव केराम हे किनवट एस टी महामंडळ ला भेट दिली असता त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत (ला. भा.) युवकांनी आमदार भिमराव केराम यांना निवेदन दिले असून या योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व विनंती केली कि आमच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबान पर्यंत पोहचवा व आम्हाला आर्थिक धैर्य प्राप्त होईल व काम करण्याचे बळ मिळेल. या वेळी आगाराचे प्रमुख वाय.खिल्लारे व एस टी महामंडळ कर्मचारी यांच्या तर्फे आमदार भिमराव केराम यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कर्मचारी यांच्या तर्फे निवेदनदेण्यात आले सदरील निवेदनावर गौतम पाटील, प्रशांत ठमके, स्वप्नील दंतवाड, वेदांत कदम, रुपेश उपलवार, सागर कोरटलावार, पद्मनाथ सेलूकर,
नेहा डबेवार, श्री सोनवणे, शाम जटाळे, अजय मानकर, विक्रम राठोड
शिवराम बेले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Discussion about this post