सोनगीर येथील बहुजन समाज शिक्षण मंडळ संचलित आर्ट कॉमर्स व सायन्स महाविद्यालय आयोजित देवभाने येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा रुग्णालय धुळे मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्ता देगावकर व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके सर जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत
या शिबिरामध्ये सिकल सेल आजार निर्मूलन अभियानाअंतर्गत सिकल सेल तपासणी व समुपदेशन शिबिर, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नेत्र दान समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला.
या शिबिरामध्ये विलास वारुडे, सिकलसेल समन्वयक व दौलत मोरे,समुपदेशक यांनी सिकल सेल आजाराबाबत माहिती तसेच सिकल सेल रुग्णांना देण्यात येणाऱ्या शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले. तसेच मनोहर धनगर,नेत्रदान समुपदेशक यांनी नेत्रदानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. आणि लक्ष्मण साळुंके,प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी केली. या शिबिरातील एकूण ६३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
हा कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य लाभले.
तसेच सिकल सेल टीम जिल्हा धुळे यांच्या आभार
Discussion about this post