पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र युवराज संभाजीराजे यांचा राजधानी किल्ले रायगडावर १६ जानेवारी १६८१ रोजी राज्यभिषेक झाला.कर्तव्यनिष्ठ युवराज संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.थोरल्या छत्रपतींनी संस्थापिलेल्या स्वराज्याचे ‘स्वराज्यरक्षक’ झाले.परिणामी त्यांच्या वाट्यास ना राजभोग आला ना त्यांना गृहसुख प्राप्त झाले.उत्तरेकडून आलेल्या मोगली परचक्राचा सामना करताना त्यांनी स्वराज्याच्या प्रतिकारातील चैतन्य जिवंत ठेवले.आठ भाषातील जाणकार,उत्कृष्ठ वाकपटू,पांडित्याचा संस्कार,बहुभाषिक कवि,राजकारण धुरंधर असणारे राजे लेखणीत श्रेष्ठ तर होतेच बरोबर आपल्या आजोबा आणि वडिलांप्रमाणे रणधुरंधरही होते.
स्वराज्याच्या तमाम रयतेच्या परमोच्च आनंदाचा क्षण म्हणजे राज्यभिषेक सोहळा होय.स्वराज्याप्रति छत्रपती शंभूराजांच्या परमोच्च बलिदानाचा आणि त्यांच्या इतिहासाच्या पुनरूत्थानाचा जागर घालण्यासाठी ,सत्य इतिहास जगापुढे येण्यासाठी,समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि विस्मरणात गेलेला राज्यभिषेक सोहळा वर्तमानाच्या कालपटलावरुन नाहीसा होऊ नये याकरिता काही शिवशंभू पाईकांनी एकत्र येत १६ जानेवारी २०१४ पासून पुनश्च एकदा हा सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर सुरू केला.दरवर्षी केंद्रीय पुरतत्व विभाग आणि तमाम शिवशंभूपाईकांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होतो.
कालपरत्वे या सोहळ्याचे स्वरूप भव्य होत असल्याने राज्यभिषेक सोहळ्यामधे समाज्यातील प्रत्येक घटकाचा समावेश असावा या उद्देशाने समिती कार्यरत असते.दरवर्षी समाज घटकातील कार्यकुशल आणि कर्तुत्ववान व्यक्तीकडून छत्रपती शंभूराज्यांच्या मुर्तीला पवित्र नद्यांच्या उदकातून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे.प्रत्येकवर्षी एका समाज घटकाला हा सोहळा समर्पित असतो.जसे की स्वराज्यकार्यातील सरदारांचे वंशज,समाजातील कर्तुत्ववान महिला,वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेले भक्ति शक्ती स्वरूप,वर्षानुवर्षे किल्ले रायगडावर राहणारे मावळे,कर्तुत्ववान मल्लांचा ‘मर्दानी राजा’,शेतकर्यांमधील शेतीनिष्ठ शेतकर्यांचा ‘पोशिंदा राजा’ या संकल्पना राबवत शंभूराजांना जलाभिषिक्त केले जाते.
या वर्षीचा सोहळा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जीवाची बाजी लावणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्याला समर्पित असणार आहे हा सोहळा क्रांतीसुर्य शंभुराजा या नावाने ओळखला जाईल
श्री शंभूछत्रपती राज्यभिषेच सोहळा समिती केवळ १६ जानेवारीच्या सोहळ्यापुरती मर्यादित कार्यरत नसून वर्षभर विविध सामाजिक कार्यात सहभागी असते.२०१९ मधे सांगली व कोल्हापूर भागात आलेल्या महापुरात जनजीवन विस्कळीत झाले होते.तेथील विद्यार्थ्यांना राज्यभिषेक सोहळा समितीने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.१४ मे १६५७ रोजी शंभूराजांचा किल्ले पुरंदर येथे जन्म झाला याचे औचित्य साधून राजांच्या जीवनचरित्रावर त्यांच्या विविध पैलूंवर विषय देऊन संपूर्ण महाराष्ट्र,कर्नाटक भागात सोशल मिडियामार्फत ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित केली जाते.याच दिवशी संपुर्ण महाराष्ट्रातून रक्तदान शिबिरांचे आयोजन सुद्धा करण्यात येते.वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी समिती कार्यरत असते.
किल्ले रायगडावर संपन्न होणार “क्रांतीसुर्य शंभूराजांचा” राज्याभिषेक सोहळा…
मागील अनेक वर्षे विस्मरणात गेलेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला पुनश्च दिव्यत्व प्राप्त करून देण्यासाठी काही मोजके शिवशंभू पाईक एकत्र येत दि. १६ जानेवारी २०१४ रोजी शंभूछत्रपतींच्या या राज्याभिषेक सोहळ्याचा श्री गणेशा केला आणि तो आजही अव्याहत पणे शिवशंभू पाईक तसेच पुरातत्व विभागाच्या सहकार्याने चालू आहे. यंदा राज्याभिषेक सोहळ्याचे दशकपुर्ती महोत्सव, या नमित्ताने एका विशेष संकल्पनेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जाणार आहे तो म्हणजेच “क्रांतीसुर्य शंभूराजा”. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जिवाची तमा न बाळगता लढा देणाऱ्या क्रांतीकारकांच्या वंशंजाच्या हस्ते भारताच्या विविध राज्यातील पवित्र नद्यांच्या जलाभिषेकांने हा सोहळा संपन्न होणार आहे.
मागील दहा वर्षात स्वराज्यातील सरदारांचे वंशंज, समाजातील कर्तृत्ववान महिला, वारकरींच्या भक्ती-शक्ती स्वरूप, रायगडावर वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेले मावळे,कुस्तीचा फड गाजविणाऱ्या मल्लांचा ‘मर्दानी राजा’, शेतकऱ्यांचा ‘पोशिंदा राजा’ या समाजातील विविध घटकातील मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे.
श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती फक्त १६ जानेवारीला रायगडावर संपन्न होणाऱ्या सोहळ्यापुरते मर्यादित नसून या माध्यमातून वर्षभर राज्यातील विविध भागात होणाऱ्या सामाजिक कार्यातही अग्रस्थानी आहे, यामाध्यमातून होणारे रक्तदान शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, पूरपरिस्थित अन्नधान्याचे वाटप, वृक्षलागवड आणि संवर्धन हि सगळी सामाजिक कामे वाखाणण्याजोगी आहेत.
जलाभिषेकांचे मानकरी
श्री.किरण जीत सिंग हुतात्मा सरदार भगत सिंग यांचे पुतणे
श्री.अँड.भाई सुभाष भगवानराव पाटील क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू
श्री. सत्यशिल कमलाकर राजगुरू हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे नातू
श्री. सज्जनराव शामराव पाटील स्वातंत्र्य सैनिक गोवा मुक्ती संग्राम १९५५
श्री. गौरव किरण नायकवडी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू
श्री. दिग्विजय सर्जेराव जेधे स्वातंत्र्यसैनिक देशभक्त केशवराव जिथे यांचे पणतू
श्री.संजीव जावळे सशस्त्र क्रांतिकारक सार्वजनिक गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांचे पणतू
श्री शंभूमहाराज राज्यभिषेक सोहळा,किल्ले रायगड,महाराष्ट्र
🙏🏻छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती, महाराष्ट्र राज्य 🙏🏻
Discussion about this post