सोयगाव
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात शनिवारी दी.१० जानेवारी आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रमा अंतर्गत निंबायती येथील कै.वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय ह्या शाळेने सोयगाव तालुक्यातुन तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, विरोधी पक्षनेता महाराष्ट्र अंबादास दानवे , सह संचालक अनिल साबळे यांच्या उपस्थितीत विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते शाळेला प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच ट्रॉफी देवून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, गट शिक्षण अधिकारी अनिल पवार , शिक्षणविस्तार अधिकारी रंगनाथ आढाव, शाळेचे मुख्याध्यापक यशवंत चौधरी,लिपिक गजानन राठोड, सेवक ज्ञानेश्वर तेली आदि मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post