प्रतिनिधी:- सूर्यकांत माने
मिनकी येथील राजेंद्र लक्ष्मण पैलवार व ओमकार राजेंद्र पैलवार या पितापुत्राने दिनांक 09.01.2025 रोजी गुरुवारी एकाच दोरखंडाने स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भाजपाचे विद्यमान खासदार श्रीमान अजितजी गोपाछडे साहेब व देगलूर बिलोलीचे विद्यमान आमदार श्रीमान जितेशजी अंतापुरकर साहेब मुंबईला असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनतापार्टी बिलोली तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी
मिनकी येथे जाऊन, पैलवार कुटुंबाचे सांत्वन केले. श्रीमान खासदार अजितजी गोपछडे साहेबांनी व आमदार जितेशजी अंतापुरकर साहेबांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या. खासदार अजितजी गोपछडे साहेबांनी फोनद्वारे कुटुंबीयांचे सांत्वन करून, पैलवार कुटुंबीयांना धीर दिले. त्याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीमान उमाकांतरावजी गोपछडे साहेब व भाजपा तालुका अध्यक्ष श्रीमान चंद्रशेखर पाटील सावळीकर भाजपा जिल्हा सचिव श्रीमान मारोती गंगाधर राहिरे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक श्रीमान हावगीरावजी गोपछडे सर, भाजपा ओबीसी जिल्हा सरचिटणीस आबारावजी संगनोड, भाजपा अनुसूचित जमाती तालुका अध्यक्ष प्रकाशजी भंडारे, अनुलोम तालुका अध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर अंगावर, भाजपाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव नाईक, गणेश शंकरराव वासरे, चंद्रकांत इबीतदार, शिवाजीराव इबितदार, शिवदर्शन स्वामी, व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post