प्रतिनिधी:- सुबहान मलंगफकीर
“भाऊ तुम्ही बोला भाऊंना काय होत नाय मी थांबतो पाठीमागे”
क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांचा 93 वा जन्मदिन गौरव समारंभ प्रसंगी कुंडल चावडी चौक येथे कॅप्टन भाऊंनी जनसमुदायासमोर बोलावे अशी सर्वांचीच इच्छा होती परंतु काही मंडळींनी भाऊंच्या प्रकृती काळजी पोटी भाऊंनी माईकवरून बोलू नये असे सुचवले, हेच वाक्य डॉ कदम साहेबांच्या कानावर गेल्यावर साहेब थेट उठले आणि त्यांनी क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांना माईक द्या कॅप्टन भाऊंना बोलूदे त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे उभी हयात त्यांनी सभा गाजवल्यात आज त्यांचे मला ऐकायचे आहे त्यासाठी मी आलो आहे मला भाऊंच्या साठी भरपूर वेळ आहे कुणी गडबड करू नका त्यांच्या स्पष्टवक्ता स्वभावाप्रमाणे सर्वांसमोर सूचना दिल्या आणि क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांचे अवघ्या दोन मिनिटाचे अंगावर रोमांच उभा करणारे भाषण डॉ कदम साहेबांनी घडवून आणले… हे संपूर्ण भाषण संपेपर्यंत नामदार डॉ कदम साहेब क्रांतीवीर कॅप्टन भाऊंच्या पाठीमागे उभे होते या फोटोतून गुरु-शिष्याचे नाते अधिकच उठून दिसते हिमालयाच्या उंचीचे साहेबांचे व्यक्तिमत्व आपल्या माणसांच्या सोबत आपुलकीचे होते. डॉ कदम साहेबांच्या व्यक्तिमत्त्वात कसलाही बडेजाव नव्हता क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या विषयी त्यांना विशेष आदर होता कुंडलच्या क्रांतिसिंह नाना पाटील दोन्ही स्मारकाच्या स्थापनेतील घडामोडीत कॅप्टन भाऊंची चाललेली तळमळ पाहून याबाबत त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर यांना सूचना दिल्या होत्या कॅप्टन भाऊंना या वयात पळवू नका कुंडलची दोन्ही स्मारके त्यासाठी निकष पाहू नका लागेल ती मदत करा कॅप्टन राम लाड हे नाना पाटलांचे जवळचे साथीदार आहेत ते स्वतः मोठे क्रांतिकारक आहेत मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो या नंतर जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी असणाऱ्या कुंडलमध्ये म्हणजे एकाच गावात एकाच महापुरुषाची म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटलांची दोन भव्य दिशादर्शक स्मारके मंजूर करून कॅप्टन भाऊंच्या तळमळीला प्रेमाला व स्वातंत्र्य सैनिकांच्या विषयी आदर सन्मान व्यक्त केला. क्रांतिवीर कॅप्टन भाऊंचे थोडके भाषण संपल्यानंतर यानंतर डॉ कदम साहेबांनी आपल्या भाषणामध्ये क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या आठवणी व कुंडल येथील मंतरलेला काळ सांगितला साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले क्रांतिसिंह नाना पाटील,जी डी बापू, कॅप्टन भाऊ, रामभाऊ पवार मामा अशा नेक क्रांतिवीरांच्या मांडीवर बसून मंतरलेल्या काळात त्यांची भाषणे ऐकून पुण्यात भारती विद्यापीठ स्थापन करण्याची जिद्द निर्माण झाली कुंडल ची लोक देशासाठी लढलेली हिमालयाच्या उंचीची आहेत मला या महान लोकांसमवेत कुंडलच्या क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंग मध्ये शालेय जीवनात अनेक संस्कार मिळाले कुंडलच्या क्रांतिवीरांना जपा अशी महान माणसे पुन्हा होणे नाही शिक्षण महर्षी कर्मयोगी डॉ पतंगराव कदम अशा थोर कर्मयोगी लोकनेत्यास विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻 अँड दिपक लाड
Discussion about this post