प्रतिनिधी:- सुबहान मलंगफकीर
कळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाले त्यामध्ये विक्रांत कांबळे यांची निवड जिल्हा संघा मध्ये झाली त्या नंतर विभागीय शूटिंग बॉल स्पर्धा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाल्या विभागीय स्पर्धेमध्ये निवड झाल्यानंतर महाराष्ट्र संघ निवड चाचणी स्पर्धा निगडी तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी महाराष्ट्र निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या या निवड चाचणीमध्ये कबनूर चे सुपुत्र विक्रांत कांबळे यांचे निवड झाली या निवडी करण्यात साठी विक्रांत यांना मार्गदर्शक म्हणून मा. श्री राजेंद्र नांद्रे कर खजिनदार शूटिंग बॉल असोसिएशन, सदाशिव माने शिवछत्रपती पुरस्कार विजेते, विभागीय सचिव आर वाय पाटील पांडुरंग कदम राष्ट्रीय खेळाडू, लक्ष्मण साठे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक शंकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले पुढील स्पर्धा ह्या ओडिसा या ठिकाणी संपन्न होणार आहेत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जिल्ह्यामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
Discussion about this post