चिपळूण (वार्ताहर) :- चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जागृत
श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री काळभैरव पंचायतन परिवारापैकी श्री देवी भवानी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर) चिपळूण येथे श्री शाकंभरी पौर्णिमा (पौष पौर्णिमा) उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने सोमवार दि. १३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने सकाळी ६ वाजता श्री भवानी मातेची पंचामृती पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी, सकाळी ७ ते १२:३० पर्यत श्री नव चंडी याग हवन, पूर्णः हुती, आरती आदी, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ संगीत भजन श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ, चिपळूण, सायंकाळी ६ ते ८ कै. वामनराव सांडविलकर संस्थापित, स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली कार्यक्रम, रात्रौ ८:३० वाजता महाआरती आदी कार्यक्रम होतील.
ग्रामदैवता श्री देवी भवानी मातेच्या शाकंभरी पौर्णिमा उत्सवात भक्तजन व नागरिकांनी त्याचप्रमाणे श्री देव भैरी (काळभैरव) व श्री देवी भवानी (भैरी भवानी) कुलदैवत असणाऱ्या भक्तगणांनी सहभागी होऊन श्री देवी भवानी मातेच्या सेवेच्या अपूर्व पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येत आहे.
_____________________
संपादक: सागर गोवळे.
Discussion about this post