जांब/ वार्ताहर…… नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभे निवडणुकीत बहुसंख्य मतांनी सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार राजेभाऊ कारेमोरे यांच्या कांद्री जिल्हा परिषद क्षेत्रातर्फे दिनांक 10 जानेवारीला कांद्री येथे जाहीर सत्कार करण्यात आला ह्या सत्कार कार्यक्रमाला कांदरी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावचे सरपंच आणि उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते ह्या सत्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या कांदरी येथील बाजार चौकात जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य सौ अनिताताई रमेश नलगोपुलवार व कांदरी येथील माजी उपसरपंच तथा तमसा अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य परमेश नलगोपालवार यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोहाळी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक तसेच मोहाळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदाशिव ढेंगे व झालेल्या निवडणुकीत स्टार प्रचारक असलेल्या प्रियंका कटरे यांच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला सत्कार सोहळा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती त्यानंतर रात्री या कार्यक्रमानिमित्त मराठी लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांदरी येथील कार्यकर्ते प्रभाकर बारई तसेच हिवरा येथील सरपंच भूपेंद्र नागफासे अनिल सोनवणे खेमराज गलबले गुरुदास गलबले रमेश नलगोपुलवार आदी उपस्थित होते.
Discussion about this post