यवतमाळ:
दारव्हा मार्गावरील उमरदा नर्सरी घाटात भारत फायन्स कंपनीच्या प्रतिनिधीला डोळ्यात मिरची पूड टाकून सहा जणांनी लुटले.याप्रकरणी लाडखेड पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात वाटमारीचा गुन्हा केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना गोवा ट्रीप साठी वाटमारी केल्याचे पोलीस तपास मधे उघड झाली. कुणाल चावरे, निखिल राऊत,अर्पित ठोसर, यश थुल, संस्कार , विवेक कोडपे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
Discussion about this post