मुकुटबन….. दि .१० जानेवारीला मुकूट बन येथील मुन्नुरवार समाज बांधवातेर्फे मा . सा . कन्नमवार यांची 125 वी जयंती मुकूटबन येथे नियोजीत जागेवर सर्व समाज बांधव उपस्थित राहून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली .
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून समाजाचे जेष्ठ बापुराव पुल्लीवार तसेच मुकूटबन ग्रामचे सरपंचा सौ .मिनाताई आरमूरवार उप सरपंच श्री अनिल भाऊ कुंटा वार ;श्री .भुमारेड्डी बाजन्लावार ;सत्यनारायन एनगंटीवार ; लोकमत पत्रकार संजय आकीनवार गनमान्य व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक विचारात श्री .विलास चिट्टलवार यांनी विदर्भासह संपूर्ण महाष्ट्राचा चोफेर विकास करून मोलाचे योगदान देणारे मुख्यमंत्री लोकनेते कर्मवीर मारोतराव उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला . तसेच गेल्या१३ वर्षापासून शासनाने थोर पुरुषाच्या जयंती दिन साजरा करण्याच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळले आहे . याबद्दल सर्व समाज बांधतात प्रचंड रोष व्यक्त होत आहे . असे आपल्या विचारातून व्यक्त केले .
कार्यक्रमाचे संचालन श्री . संजय आगुलवार यांनी पार पाडले .
कार्यक्रमासाठी अनेक समाज बांधव बहुसंख्य उपस्थित होते .
Discussion about this post