तालुका प्रतिनिधी : कापडणे येथील नुतन माध्यमिक विद्यालय येथे हिवाळी शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळी खो-खो,क्रिकेट,लिंबू चमचा गोनपाठ,बुद्धिबळ,संगीत खुर्ची,स्लो सायकल,बॅडमिंटन,100 मीटर धावणे,गोळा फेक इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या दोन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला व खेळाचा आनंद घेतला.
या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय क्रीडा स्पर्धेत आयोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी शिक्षक.एस.पी.एंडाईत,ए.डी.पाटील,बी.ए.माळी,एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे,पी.सी.धनगर,व्ही.आर.माळी,डी.डी.सोनवणे,जी.
एस.कुवर, महेंद्र मनोहर माळी,तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



Discussion about this post