जालना- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मराठवाडा विभागाच्या वरिष्ठ अध्यक्षपदी शाम कचरू साळवे मुक्काम पोस्ट दाढेगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांची निवड झाली असून, पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीतून कसलंही तोड पाणी न करणारा कार्यकर्ता म्हणून शाम साळवे यांची जिल्ह्याला ओळख आहे. तंटामुक्ती अध्यक्ष ते शेतकरी सहकारी सोसायटी संचालक म्हणून त्यांनी आपल्या नावाचा लौकिक मिळवला असून, समाजात तळागाळामध्ये जाऊन अन्यायाच्या विरोधात लढा उभा करून न्याय देण्याचे काम शाम साळवे यांनी वडिलांचा वारसा चालवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विस्ताराने मोठा असलेल्या मराठवाडा विभागाच्या सामाजिक चळवळीच्या वरिष्ठ अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.निवडी नंतर बोलताना शाम साळवे म्हणाले की, अनेक सामाजिक चळवळींचा भूतकाळातील इतिहास मी बघितला असून भविष्यात त्याच्यामध्ये सुधारणा करून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघर्ष परिषदेचा विचार आणि काम गावोगावी पोहोचवण्याचे काम करणार आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
Discussion about this post