तालुका प्रतिनिधी राज मेटकर मो.९५२७२९७८७३ विसरवाडी गावातून गेल्या दि.8 जानेवारी पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह कोंडाईबारी घाटातील दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती …..
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण स ईद शाह चिराग शाह वय 32 हा बेपत्ता झाला होता.. पोलीसां कडुन शोध सुरू असताना दि.11 जानेवारी रोजी कोंडाईबारी गावातील गुरे चारणा-यांना कोंडाईबारी घाटातील 30 फुट दरीत मृतदेह दिसुन आला तरुणाच्या मारुन तोंडावर काळ्या रुमालाने बांधलेले हातपाय ला सफेद रंगाच्या दोराने बांधलेले दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साक्री पोलीस ठाण्या दिली
घटनास्थळी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व पोलीस कर्मचाऱ्यांना भेट दिली सदरचा मृतदेह काळा पडुन कुजलेल्या अवस्थेत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला या वरुन हा मृतदेह स ईद शाह रा.विसरवाडी याचा असल्याचे निष्पन्न झाले होते याबाबत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्यांनी तपासचक्रे फिरवुन अवध्या दोन दिवसात मारेकरीचा छडा लावला …
या खुनाचा मुख्य सुत्रधार सख्या पुतण्याच निघाला वैरी मयत काका हा दररोज दारू पिऊन गावात धिंगाणा करतो कोन्हाशीही भांनगड करतो फिरतो कुटुंबातील सर्वांना अश्लील शिवीगाळ करतो यामुळे माझ्या वडिलांची इज्जत खराब होत असल्याने याचा राग होता म्हणून पुतण्या संशयित आरोपी अवैश सलीम शाह व त्याचा मित्र बबलु मुबारक शाह रा.विसरवाडी या दोघांनी संगणमत करून मयत स ईद शाह काकाला जिवेठार करून त्याचा मृतदेह स्विपट कार मध्ये बसवुन तोंडावर काळा रुमाल बांधुन हातपाय दोराने बांधुन पुरावा नष्ट करण्यासाठी कोंडाईबारी घाटातील 30 ते 35 फुट दरीत फेकुन दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे…
याबाबत दोघां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्रीराम पवार ,पो.उप.नि.अमित माळी हे.कॉ.सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे,तुषार सुर्यवंशी यांनी केले आहे…
Discussion about this post