
राजेश मापारी
लोणार ता प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
लोणार न.पा.चे भ्रष्ट मुख्यधिकारी यांची चौकशी करा राजेश मापारी
येथील नगरपालिकेला प्रशासक म्हणून काम करीत असलेली मुख्याधिकारी यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून त्यांच्या कार्यकाळातील कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवुन नियमानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी यांनी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
लोणार शहर अ वर्ग दर्जाचे जागतिक पर्यटन स्थळ आहे येथील सरोवर धार्मिक स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक शहराला भेट देत असतात या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा म्हणून शासनाच्या वतीने लोणार विकास आराखडा तयार करून त्यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे न पा अंतर्गत येणारी कामे नियमानुसार करून घेण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे परंतु प्रत्येक कामात कमिशन घेऊन ठेकेदार करत असलेल्या निकृष्ट कामाला पाठीशी घालण्यात येत आहे शहरातील जनतेशी त्यांच्या समस्यशी त्यांना काहीही देणे घेणे शहराला महिन्यातून केवळ एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येतो तोही अशुद्ध, शहराला शुद्ध व पुरेपूर पाणी मिळावे म्हणून कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली पाणी साठवण्यासाठी शहरात जलकुंभ बांधकाम करणे आवश्यक असताना मुख्यधिकारी यांनी जलकुंभासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही काळे पाणी या ठिकाणावरून सुद्धा 2017 18 मध्ये शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली परंतु मागील पाच सहा वर्षांपासून ही योजना पूर्ण झाली नाही योजना पूर्ण का करत नाही म्हणून संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित असताना मुख्याधिकारी आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना पाठीशी घालत आहेत शहर स्वच्छतेचे टेंडर 2024 मध्ये संपले आहे, नवीन टेंडर काढणे आवश्यक असताना त्याबाबतीत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही साफसफाई करण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत जागोजागी पाण्याची गटारे भरलेली आहेत यामुळे शहरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे याला सर्वस्वी प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या मुख्यअधिकारी यांचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे नगरपालिकेच्या वतीने 2015 16 मध्ये कर आकारणी करण्यात आली होती त्यानंतर शहर झपाट्याने वाढले नवीन वाढलेल्या घरावर कर आकारणी करावी म्हणून 2022 ला ठराव घेण्यात आला व एजन्सीला काम देण्यात आले त्या एजन्सी ने त्यांचे काम पूर्ण केले नगररचना विभागाने कर आकारणी पूर्ण करून देण्याबाबत कारवाई केली परंतु आजपर्यंत कर आकारणी करण्यात आली नाही मुख्याधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले शहरातील गोरगरीब नागरिकांना घरकुले मिळावीत म्हणून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही गोरगरिबांना घरकुला पासून वंचित ठेवण्याचे काम करण्यात येत आहे शासनाकडून मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहामध्ये लायब्ररी साठी निधी दिला होता, त्या निधीतून वाचनालयासाठी आवश्यक असलेल्या वस्तूची खरेदी करण्याचे ठरले होते परंतु ह्या वस्तू हलक्या व निकृष्ट दर्जाच्या त्याही अर्ध्याच खरेदी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे शहरामध्ये नगरपालिकेची परवानगी न घेता 1700 घरी बांधण्यात आलेली आहेत व शेकडो घरे बांधण्यात येत आहे याकडे मुख्य अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न बुडत आहे शहरातील लेंडी तलावाचा विकास व्हावा म्हणून शासनाकडून 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत परंतु तलावाच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे हे अतिक्रमण काढण्यास मुख्याधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत शहरातील काही खाजगी जमीन मालकांनी त्यांच्या जागेमध्ये एन. ए. प्लॉटिंग केलेली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी रस्ते नाल्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी प्लॉटिंग करणाऱ्या संबंधित जागा मालकाची आहे परंतु अशा ठिकाणी नगरपालिकेने शासनाच्या निधीतून रस्त्याची कामे केलेली आहेत ही कामे करताना मुख्य अधिकारी व संबंधित अभियंत्यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे संबंधित रक्कम मुख्याधिकारी व इंजिनियर यांच्याकडून वसूल करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या सर्व भ्रष्टाचाराला नियमबाह्य काम करण्याला प्रशासक मुख्याधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेश मापारी यांनी उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
Discussion about this post