प्रतिनिधी सुधीर गोखले
मिरज हे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेले अत्यंत महत्वाचे शहर आहे त्याच बरोबर येथील रेल्वे जंक्शनही तितकेच महत्वाचे आहे कर्नाटक आंध्रप्रदेश सारख्या राज्यांना महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र हा या जंक्शन ने जोडला गेला आहे. नुकताच मध्य रेल्वे चे पुणे विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी मिरज रेल्वे जंक्शन ला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांची पहाणी केली तसेच मिरज ते कोल्हापूर मार्गाचीही पहाणी केली आणि काही सूचनाही दिल्या त्यांचे स्वागत रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील उद्योजक गजेंद्र कुल्लोळे, ओंकार शिखरे, ज्ञानेश्वर पोतदार, राकेश कुकरेजा, आदी मान्यवरांनी केले. काही महिन्यांपूर्वी सांगली मिरज रस्त्यावरील रेल्वे च्या जागेवरील हटवलेल्या अतिक्रमण जागेचीही पहाणी केली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले कि या जागेवर आता रेल्वेचा पहिलाच मल्टिफंक्शनल मॉल उभा राहणार आहे. या मॉल साठीची निविदा प्रक्रिया सुरु आहे. या मॉल मध्ये हॉटेल्स दुकाने सिनेमागृह आदी नागरिकांसाठी उपलब्ध असेल. रेल्वे जंक्शन वरील सुरू असलेल्या कामामध्ये वर्मा याना काही त्रुटी आढळून आल्या संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी यावेळी कानउघडणी केली. तसेच ऍक्सीडेन्ट रिलीफ व्हॅन, गुड शेड, आर आर आय लॉबी, आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले. नेहमीप्रमाणे स्थानिक प्रशासनाने वर्मा यांच्या दौऱ्या दरम्यान स्थानक चकाचक ठेवले.
उभा राहणार आहे.
Discussion about this post