जांब\वार्ताहर :- दि.१५ जानेवारीला जांब येथील शेतकऱ्यांना व शेतामध्ये काम करत असलेल्या मजुरांना वाघाचे सायंकाळी ५च्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. त्वरित शेतकऱ्यांनी कांद्री येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले परंतु सायंकाळ झाली असल्याने वन कर्मचारी येऊ शकले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन कांद्री येथील वन विभागाच्या टीमनं संपूर्ण शेतशिवाराचा व आजूबाजूच्या परिसराचा तपास केला परंतु कोणत्याही प्रकारचे पगमार्क आढळून आले नाही परंतु शेतकऱ्यांना हुबेहूब वाघ आढळल्याने सतर्क राहण्याचे आवाहन वन विभाग कांद्री व वन परीक्षक यांनी केले आहे.व शेत शिवारात जाताना सांभाळून जावे रात्री व दिवसा एकटे न जाता तीन ते चार जण सोबत मिळून जावे व वाघ आढळल्यास त्वरित वन विभागाला कळवावे असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांनी केले आहे. काही दिवसा अगोदर पीटेसुर येथे वाघाने एका इसमाला ठार केले होते व सोरना येथील म्हशीला जागीच ठार केले होते. ही घटना ताजी असता पुन्हा एकदा वाघाने आपली दहशत कायम ठेवली आहे.
📌 कोणत्याही प्रकारचे हिंसक प्राणी शेतशिवारात अथवा आजूबाजूच्या परिसरात आढळल्यास त्वरित वन विभागाला कळवावे व रात्रीच्या वेळी व सकाळी शेत शिवारात जाताना एकटे न जाता घोळक्याने जावे.
कु.अपेक्षा शेंडे
वनपरिक्षेत्र अधिकारी
वन विभाग कांद्री(जांब)
Discussion about this post