वन्यजीव प्राण्यांचा धुमाकूळ शेतकरांचे नुसकान
तालुका प्रतिनिधी अहमदपूर
अहमदपूर : तालुकायातील शेतकरी पाऊसातून सावरला नाही तोपर्यंत वन्यप्राणी पिकाचे नुकसान करीत आहेत.मागील काही दिवस पाऊस पडला असताना पिकावर आली, चिकटा, तेल्या असे रोग दिसून येत असताना शेतकऱ्यांना पाऊस लागून बसला होता. पाऊस असल्या मुळे शेतकऱ्यांना फवारणी कोलपनी करता आली नाही. त्या मुळे सोयाबीन, मूग, कापूस उडीद पिकावर रोग पडलायला असताना पाऊस कमी झाला. उगाड दिली असताना हाताला आलेले मूग उडीद काढणी ला आले
असता वन्यप्राणी पिकला खाऊन तुडून वाटोळे केले आहे. हाताला आलेले शेतकऱ्यां चे पिके गेल्याने शेतकरी अडचणी आला आहे. खंडळी सर्कल मधील रुद्धा, टाकळगाव, सुमठाणा, सांगवी या गावातील पिकाचे नुस्कान झाले आहे.या सर्व गावातील शेतकरी वन्यजीव प्राण्यांना त्रासत झाला आहे. शेतकऱ्याला पेरणी पासून ते काढणी पर्यत त्रास होत आहे. त्यात पीकाचे होणारे नुस्कान कोण भरून देणार.महागामोलाचे खते बी बियाणे घालून जर हाताला आलेले पीक पदरात पडत नसेल तर काय उपयोग शेतकऱ्याने काय खावे उत्पन्न तर नाहीच.
Discussion about this post