(आपापल्या गटातील वेगवान धावक म्हणून विहान सुंकरवार, सय्यद जवेरिया, समरजीत माने, आरोही माळी, ओंकार वळसांगे, आरोही डोंगरे, आर्यन भोसले, केतकी पाटील यांनी पटकावले सुवर्णपदक)
उदगीर /कमलाकर मुळे :
लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सब ज्युनिअर मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळेतील वयोगटानुसार 8, 10, 12 व 14 वर्षाखालील मुले- 209 व मुली- 116 एकूण- 340 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी विशेष हातभार रिद्धी सिद्धी बाल रुग्णालयाचे संचालक- डॉ. संतोष बिरादार, श्री कृष्णा फ्लाय अँड हार्डवेअरचे संचालक- श्री. मनोज हुलसुरे, गायत्री स्पोर्ट्सचे संचालक- श्री. सत्यजित गायकवाड, शौर्य स्पोर्ट्सचे संचालक- श्री. युवराज राठोड, गोल्डन वाईब्स इनचे संचालक- श्री. दिगेन बिरादार यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत प्रायोजकत्व स्वीकारले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर संघटनेचे सहसचिव श्री. निजाम शेख, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. संतोष बिरादार, श्री. मनोज हुलसुरे, श्री. युवराज राठोड, श्री. दिगेन बिरादार, प्रा. सतिष मुंढे, प्रा. डॉ. सचिन चामले हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव ॲड. विक्रम संकाये, कार्याध्यक्ष प्रा.व्ही.आर.हुडगे यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विविध समित्यामध्ये व पंच म्हणून प्रा. डी. आर. मुंढे, श्री. लक्ष्मण सोनकांबळे, प्रा. निहाल खान, श्री.तुळशीदास पोतने, प्रा. डॉ. शिवानंद पाटील, प्रा.सचिन चौधरी, श्री. राहुल होनसांगळे, श्री. मंडले अंकुश, प्रा. रोहन ऐनाडले, श्री. रमेश सूर्यवंशी, श्री. वीरसागर काळे, श्री.समाधान बुर्गे, श्री. साईनाथ कांबळे, कु.सोनल उदबळे, श्री. सावन जाधव, श्री.मारुती बिरादार, श्री.जनक घोगरे, श्री.अमर सूर्यवंशी, श्री. मिथुन शिंदे, श्री.अंकित जाधव, कृष्णा केंद्रे, अरविंद पांचाळ यांनी कामे पाहिले. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम निकाल
8 वर्षाखालील मुले – 50 मीटर 1. विहान दत्तराज सुंकरवार 2.अविनाश पांडुरंग दंडे 3.वेदांत कार्तिक कोळे 100 मीटर- 1.विहान दत्तराज सुंकरवार 2.अविनाश पांडुरंग दंडे 3.आथर्व यशवंत हूड स्टॅंडिंग ब्रोड जंप – 1. प्रभास मच्छिंद्र किवंडे 2.ओजेस सावन जाधव 3.रुद्र महेश मुसळे
मुली- 50 मीटर 1. सय्यद जवेरिया मुजीब 2. प्रिया संदीप राठोड 3.शिवानी नयननाथ इप्पर 100 मीटर-1. सय्यद जवेरिया मुजीब 2. प्रिया संदीप राठोड 3.वेदिका नितेश भुताडा स्टॅंडिंग ब्रोड जंप – 1.प्रिया संदीप राठोड 2.सय्यद जवेरिया मुजीब
10 वर्षाखालील मुले – 50 मीटर 1.समरजीत प्रशांत माने 2.रेवंश सुधीर सुर्यवंशी 3.यशवर्धन ओमप्रकाश देवकट्टे 100 मीटर- 1.समरजीत प्रशांत माने 2.रेवंश सुधीर सुर्यवंशी 3.यशवर्धन ओमप्रकाश देवकट्टे स्टॅंडिंग ब्रोड जंप – 1.रुद्रप्रताप युवराज गिरी 2.आयुष राजकुमार घोडके 3.समरजीत प्रशांत माने
मुली- 50 मीटर 1.आरोही गोपाळ माळी 2.दुर्वा केदारलिंग जामदोरे 3.देविका मंगेश चोले 100 मीटर- 1.स्वरा बाळकष्णा गिरी 2.आराध्या संदीप स्वामी 3.सोनल संदीप राठोड स्टॅंडिंग ब्रोड जंप – 1.आरोही गोपाळ माळी 2.दुर्वा केदारलिंग जामदोरे 3. रिया रवी रामटेके
12 वर्षाखालील मुले – 60 मीटर – 1.ओंकार तुकाराम वळसांगे 2.शिवांश बाळकृष्ण गिरी 3.सोहम विजयकुमार दडगे 300 मीटर- 1.साईनाथ संगम शिंगारे 2.समर्थ दिपक कात्रे 3.विक्रांत संजय दळवे लांब उडी – 1. शिवांश बाळकृष्ण गिरी 2.ओंकार तुकाराम वळसांगे 3.कृष्ण एकनाथ यगडे गोळा फेक- 1.सोहम ओम दासरे 2.रघुनंदन हरिभाऊ नागरगोजे 3.शौर्य श्याम देशमुख
मुली – 60 मीटर 1.आरोही विकास डोंगरे 2.हर्षदा संतोष कोळे 3.आरोही उमेश धामणगावकर 300 मीटर- 1.त्रजश्विने बालाजी बाळाने 2.अर्ना अमित लोया 3.जानवी प्रदीप घोरपडे लांब उडी – 1.आरोही विकास डोंगरे 2.त्रजश्विने बालाजी बाळाने 3.दुर्गा अविनाश जाधव गोळा फेक- 1.आदिती सुनील गायकवाड 2.रेवा पुष्पराज खुबा 3.अचल विनीत पाटील
14 वर्षाखालील मुले – 80 मीटर – 1.आर्यन नंदकुमार भोसले 2.आर्यन बजरंग करटकर 3.साईनाथ सतीश नरळे 300 मीटर- 1.आर्यन नंदकुमार भोसले 2. उत्कर्ष माधव शिलुकर 3.समर्थ रामप्रसाद लखुटे लांब उडी – 1.राघव दिलीप सरगे 2.साईनाथ सतीश नरळे 3.आदर्श बालाजी गडकर गोळा फेक – 1.सार्थक महादेव धनशेट्टे 2.आर्यन बजरंग करटकर 3.पृथ्वीराज विनोदकुमार राठोड
मुली – 80 मीटर 1.केतकी परमेश्वर पाटील 2.प्रेरणा सोमनाथ बेलुरे 3.सायली दत्तात्रय देशमुख – 300 मीटर- 1.प्रेरणा सोमनाथ बेलुरे 2.इंदुमती संजय नामवाड 3.श्रावणी युवराज चालक लांब उडी – 1.वेदिका उमकांत मलवडे 2.प्रणाली मुरारी गायकवाड 3.प्रेरणा सोमनाथ बेलुरे गोळा फेक – 1.वेदिका उमकांत मलवडे 2.नव्या प्रशांत हलकुडे 3. रचना रवी पुणेकर
सचिव
लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन
लातूर
Discussion about this post