अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र संघटनेच्या पदाधिकानांचे राज्यस्तरीय चर्चासत्र
पालघर, (वा.) अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय चर्चासत्राचे पालघर येथे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात महा ई सेवा व आधार केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ही महत्वपूर्ण बैठक हॉटेल रमणीय रेसिडेन्सी, केळवा, ता. जि. पालघर येथे पार पडली. चर्चासत्रात महा ई सेवा व आधार केंद्रांसमोरील अडचणी, सवलती, शासन धोरणे आणि भविष्यातील वाटचाल यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
महा ई सेवा केंद्र होणार सक्षम
या चर्चासत्राच्या माध्यमातून महा ई सेवा केंद्रांना अधिक सक्षम कसे करता येईल, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभजनतेपर्यंत कसा पोहोचवता येईल यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमास राज्यातील विविध जिल्हयातील संघटनांचे राज्य प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष व महा ई सेवा केंद्र चालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
तालुका प्रतिनिधी
इमरान खतीब पुसद
9822050220
Discussion about this post