उदगीर / कमलाकर मुळे : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये बिरादार प्राची राजविक्रम ९७.४६ महाविद्यालयामधून सर्वप्रथम,कोनाळे पूनम दत्तात्रय,८५.९६ द्वितीय,गुरनाळे अनिकेत विष्णुदास यांनी ८०.८६%घेऊन तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर,संस्थेचे सचिव पी.टी.शिंदे,सहसचिव हिरागिर सिध्दगिरगिरी,कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील,व संस्थेचे कार्यकारणी सदस्य,पदाधिकारी,प्राचार्य डाॅ.रामकिशन मांजरे,पर्यवेक्षक जी.जी.सुर्यवंशी, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post