
उदगीर /कमलाकर मुळे :
येथील प्रा.सिध्देश्वर पटणे यांच्या इच्छापुर्ती कोचिंग क्लासेस तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत वैजापूरे होते.यावेळी उद्घाटन माजी आमदार गोविंद केंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर,बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटील,भरत चामले,बस्वराज पाटील कौळखेडकर,बापुराव राठोड,विजयकुमार चवळे,राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड,श्रीकांत पाटील,वनाधिकारी बालाजी मुदाळे,प्रा.व्यंकट ढोबळे,माजी प्राचार्य चंद्रसेन मोहिते,आदी उपस्थित होते.कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल कुणाल बागबंदे व बापुराव पटणे,दिल्ली येथील भारत सरकारचा यंग लीडर अवाॅर्ड विजेत्या वैष्णवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात दहावी ,एनएमएमएस,स्कॉलरशिप ,नवोदय,अशा विविध परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या ३४०विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.सुञसंचालन प्रा.संजय जामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर भोकरे यांनी केले..
Discussion about this post