राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत नवीन वर्षात देखील ह्या बदल्यांची सत्र सुरूच आहे गेल्या दोन महिन्यात जवळपास 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत त्यानंतर 18 फेब्रुवारी पुन्हा एकदा राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील नऊ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आदेश जारी केले आहेत त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील डॉक्टर सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर
महानगरपालिका आयुक्त पदी व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बनसोडे यांची बदली आदिवासी विकास आयुक्त नाशिक येथे तर गडचिरोली सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची बदली साखर आयुक्त पुणे येथे झाली आहे तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिलिंद कुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाले आहे तर कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आले आहे तर आदिवासी विकास आयुक्त नयना गुंड यांची बदली महिला आणि बालविकास आयुक्त पुणे येथे झाले आहे समग्र शिक्षा अभियान राज्य प्रकल्प संचालक विमला आर यांची नेमणूक निवासी आयुक्त आणि सचिव म्हणून महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे.
Discussion about this post