
नितेश केराम..
दि. 19/2/2025 ला मौजा दुर्गाडी येथे 395 वी शिवजयंती व शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा मोट्या उत्साहात पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बाबाराव खडसे उदघाटक श्री. रामचंद्र ठाकरे आणि सत्कार मूर्ती श्री.दौलत धांडे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अनिल पा खडसे पो पा दुर्गाडी संजय खडसे संजय महाजन खडसे करणं ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष मनोहर वानखेडे दिनेश खडसे संतोष देवताळे गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
सकाळी 5:30 वाजता प्रभातफेरी ग्राम स्वच्छता व महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. 59 महिला स्पर्धेत सहभागी झाल्या रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुर्गाडी चे मुखध्यापक केंद्र प्रमुख श्री.शंकर तलांडे सर श्री.सुंदरलाल गेडाम सर श्री. विनोद किनाके सर श्री.यादव गुरनुले सर श्री.नरेंश तोंडासे सर चनई श्री.संजय गाताडे सर यांनी मेहनत घेतली संध्याकाळी ठिक 7 वाजता शिवचरित्र व्याख्यान प्रा विठ्ठल आवंडे सर श्री.सुभाष बेरड उ श्री. मुख्यद्यापक काढोली श्री मंदे सर उपस्थित झाले. गावच्या वतीने शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले. त्या नंतर 8 वाजता व्याख्यान सुरु झाले आणि 11 वाजता आणि 11 वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला..
Discussion about this post