परभणी, दि.20 /02/2025. जिल्ह्यातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारीबाबत किंवा मागणीबाबत दोन प्रतिमध्ये अर्जासह जनता दरबारास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post