- जनतेच्या मदतीसाठी सदैव धावून येणारे आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांचा आदर्श उपक्रम.
गेवराई प्रतिनिधी : दिनांक 20 फेब्रुवारी, सदैव जनतेच्या मदतीसाठी झटणारे बीडचे आरोग्य सेवेतून हजारो कुटुंबांना मायेचा हात देणारे आरोग्य दूत बाजीराव चव्हाण हे करोना-लॉकडाऊन काळापासून अनेक प्रकारे समाजाच्या मदतीसाठी धावून जात आले आहेत. अनेक प्रकारची मदतयंत्रणा राबवण्यात बीडचे लाडके आरोग्य दूत बाजीराव दादा चव्हाण यांनी पुढाकार घेत सामान्य बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बीड शहरातील देखील सर्वसामान्य गरजू कुटुंबाच्या मदतीला धावून जाण्याचे काम चव्हाण यांनी वेळोवेळी केले आहे.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले बाजीराव चव्हाण हे करोना-लॉकडाऊन जाहीर झाले, तेव्हापासून अनेक प्रकारे समाजाच्या मदतीसाठी धावून जात आले आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून अनेक प्रकारची मदतयंत्रणा राबवण्यात बाजीराव चव्हाण यांनी पुढाकार घेत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना “आरोग्य योद्धा’ म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर तयार झाली आहे. याच समाज हिताचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगी घेऊन एक आदर्श उपक्रम राबवत बाजीराव चव्हाण यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त आपल्या बाजीराव (दादा) चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांना कळवून बीड जिल्ह्यातील गरजू बेघर मजूर कुटुंबांना मोफत किराणा किटचे वाटप करण्याचे आयोजन केले होते. त्यानंतर लगेचच बाजीराव चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे, आणि धर्मवीर प्रतिष्ठान चे सहकारी विलास सातपुते यांनी पुढाकार घेत बीड मधील गरजू कुटुंबांची भेट घेत या मोफत किटचे वाटप दिनांक 19 आणि 20 फेब्रुवारी बीड मधील काही बेघर, गरजू, कुटुंब यांना घरपोच मोफत किटचे वाटप केले. अखंड हिंदुस्तानचे कुलदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आणि जयंती देशभर साजरा होत असताना त्यांच्या विचारांचा आदर्श घेत बाजीराव दादा चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे, आणि विलास सातपुते यांनी बीडमधील काही बेघर, गरजू, मजूर, कुटुंबांना या मोफत किराणा किटचे वाटप करून एक आदर्श उपक्रम जगासमोर मांडला आहे.
त्यामुळे त्यांचे सर्वच पातळीवर कौतुक होत आहे. असाच समाज उपयोगी उपक्रम राबवून अनेकांनी महापुरुषांची जयंती साजरी करावी असा संदेश या उपक्रमातून देण्याचे काम बाजीराव (दादा) चव्हाण युवा मंचने करून दाखवले आहे. त्यामुळे आरोग्य दूत बाजीराव चव्हाण व त्यांच्या टीमच्या कार्याचे महाराष्ट्रभर सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी उपस्थित शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे जिल्हाप्रमुख महादेव मातकर, ऋषिकेश करंडे, एकनाथ लंगे, व बाजीराव चव्हाण युवा मंच तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post