किनवट :-राम पावडे
7798316903
या निमित्ताने दिनांक १९ पेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, कलावती गार्डन, किनवट येथे, मुंबई येथील सुप्रसिद्ध महानाट्य शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हे महानाट्य सारा प्रस्तुत, भगवान मेदनकर निर्मित, लेखक राजकुमार तांगडे, दिग्दर्शक नंदू माधव, आणि संकल्पना, गीत-संगीतकार संभाजी भगत यांच्या
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे एक सामाजिक, ऐतिहासिक आणि वास्तववादी महानाट्य आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेतं. यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त पारंपरिक कथनातून नाही, तर आधुनिक काळातील सामाजिक परिस्थितीशी जोडून मांडला जातो. विशेषतः उपेक्षित आणि शोषित समाजाच्या दृष्टीकोनातून शिवरायांच्या विचारांची नव्याने मांडणी केली आहे. यात प्रसिद्ध गायक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजी भगत यांचे गीत-संगीत विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांची लोकशाही आणि परिवर्तनवादी विचारांवर आधारित गीते प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळीच ऊर्जा देतील. शिवप्रेमी साठी हे एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. नाट्यरसिक आणि इतिहासप्रेमींनी या अद्वितीय महानाट्याचा अवश्य लाभघ्यावा, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती किनवट च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंती उत्सवात भरघोस
महाराज जयंती उत्सव समितीकडून करण्यात येत आहे. या महानाट्यासोबतच शिवजयंतीनिमित्त किनवटमध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून जाणार असून, या ऐतिहासिक
महानाट्याला स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, किनवट च्या वतीने अध्यक्ष विक्रम पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे, स्वागताध्यक्षप सचिन कदम, उपाध्यक्ष ओम काकडे, पांडुरंग बादड, अरविंद कदम, आदित्य कदम, कोषाध्यक्ष निरंजन मिराशे प्रसिद्धी प्रमुख आकाश इंगोले, कार्यकारणी सदस्य रवींद्र केसरे, भुजंग चव्हाण, अरुण दिवसे, अरविंद सूर्यवंशी, प्रकाश गोरे, रितेश मंत्री, अवधूत कदम, प्रदीप कोल्हे, गोविंद आरसोड, कृष्णा मुंगल, सारंग पवार, कृष्णा सोमवंशी, लकी पवार, अमोल सोमवंशी, सोपान शिंदे, महेश दिवसे, राज कानवटे, रोहित
Discussion about this post