
किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बाल संस्कार केंद्रामध्ये आज दिनांक 20 फेब्रुवारी वार गुरुवार रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख. एस.एस. यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले ‘दर्पण’ वर्तमानपत्र सुरू केले. त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post