
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बुलढाणा दक्षिणच्यावतीने दिनांक 12 /2 /2025 रोजी गाव तिथे शाखा या अभियान अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा या गावी महादजी शिंदे यांच्या स्मुर्ती पित्यर्थ जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली शाखा स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष adv. उर्मिला हाडे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.प्रिया हराळे मॅडम व तसेच प्रमुख उपस्थिती शिवमती सुनिता सोळंके यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ ,सावित्री ,शिवबा यांच्या प्रतिमापूजनांनी व दीपप्रज्वलांनी करण्यात आली नंतर सामूहिक जिजाऊ वंदना घेतली. स्वागत समारंभा नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रिया हराळे यांनी केले, जिजाऊ ब्रिगेडच्या संपूर्ण कार्याचा आढावा व मराठा सेवा संघ यांचे ‘पंचसूत्र’ ची माहिती त्यांनी दिली, त्यानंतर महिलांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली, ग्राम शाखेचे अध्यक्ष शिवमती अश्विनी जाधव, उपाध्यक्ष शिवमती सुजाता गवारे, ग्राम शाखा सचिव शिवमती संगीता जाधव, ग्राम शाखा सहसचिव शिवमती सविता बोडखे, ग्राम शाखा कोषाध्यक्ष शिवमती माधवी जाधव, ग्राम शाखा संघटक शिवमती अनुराधा जाधव, ग्राम शाखा सह संघटक आश्विनी काळुसे, ग्राम शाखा प्रवक्ता शिवमती उषाताई जाधव, ग्राम शाखा प्रसिद्धीप्रमुख शिवमती मंगल जाधव तर शिवमती सुनिता जाधव, शिवमती मीना उगले, शिवमती वैजयंतीमाला जाधव, शिवमती प्रीती जाधव, शिवमती शरयू जाधव यांची सदस्य या पदाकरिता नियुक्ती करण्यात आली, यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष adv. उर्मिला हाडे यांनी महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज ,संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतल्या जाते, पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याची कार्य महादाजी शिंदे यांनी केले असे सांगून त्यांच्या कार्याचा उजाळा केला. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या संपूर्ण कार्याची माहिती दिली व मराठा सेवा संघाच्या 33 कक्षा विषयी माहिती सांगितली तसेच येणाऱ्या शिवजयंती उत्सवाची तयारी व शिव विचार बैठकीच्या आयोजनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय उपाध्यक्ष शिवमती सुलभाताई जाधव यांनी केली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवमती आश्विनी जाधव यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास किनगाव राजा येथील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती..
Discussion about this post