उदगीर /कमलाकर मुळे: छत्रपती शिवराय हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारत व विश्वाचे आराध्य दैवत आहेत .शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब स्त्रिया या सर्वाच्याच हिताचा विचार करणारा राजा म्हणजे, शिवाजी महाराज होय. जुलमी पारतंत्र्यातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी केले.
त्यामुळे शिवचरित्रातून राष्ट्रीय चरित्र निर्माण व्हावी, असे मत प्राध्यापक सिद्धेश्वर लांडगे यांनी व्यक्त केले .ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समितीच्या वतीने आयोजित शिवचरित्रातून काय शिकावे? या विशेष व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर दिनविशेष समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर, प्राध्यापक सचिव डॉ.भालचंद्र करांडे,डाॅ.सुरेश लांडगे यांची विशेष उपस्थिती होती .पुढे बोलताना प्राध्यापक लांडगे म्हणाले, आपल्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्येचे उत्तर शिवचरित्रात सापडेल. मानवतावादी नैतिक मूल्यांची रुजबंद छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकात केली त्यातूनच स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ची लोकशाही मूल्य समाजामध्ये निर्माण झाली. शिवचरित्रातून संस्काराची शिदोरी प्रत्येकाने प्राप्त करावी ,असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के म्हणाले ,छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व तळपत्या सूर्यासारखे आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे कुशल संघटक म्हणजे छत्रपती शिवराय होय. विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांच्या गुणांचा अंतर्भाव व्हावा.यासाठी शिवचरिञाचे प्रत्येकांनी वाचन करावे,असे मत व्यक्त केले.कार्यक्रमादरम्यान दर्पणकार बाळशास्ञीजांभेकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अवंतिका गायकवाड, आनंद बोडके, श्रीकांत पंचगुडे ,सचिन वामनवाढ यांची भाषणे झाली मुक्ता सूळ आयोध्या पवार यांनी छत्रपती शिवरायांवर कविता तर प्राजक्ता बिरादार यांनी पोवाडा सादर केला. ज्योतीराम साळुंखे ओंकार सूर्यवंशी गोपाळ कांबळे या विद्यार्थ्याने छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर भितीपत्रक तयार केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वरी बनसोडे या विद्यार्थिनीने केले. सूत्रसंचालन अक्षिता जाधव यांनी तर आभार प्राजक्ता बिरादार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर बालाजी होकरणे, डाॅ.राहुल आलापुरे,डाॅ.अर्चना मोरे,डाॅ.बळीराम भुक्तरे यांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post