- वारकरी संप्रदायावरती दुःखाचा डोंगर
लोहा कंधार प्रतिनिधी……..
वैराग्यमूर्ती बालब्रम्हचारी भागवतकार , कीर्तनकार ज्ञानोबा माऊली भालके यांना जामगाशिवनी येथे आज अखेरचा निरोप..
माऊली महाराज भालके हे लहानपणापासून माऊली महाराज उंब्रजकर यांच्या सानिध्यात लहानाचे मोठी झाले. उंब्रजकर महाराजांच्या सेवेत त्यांनी भरपूर वेळ घालवला आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कीर्तनाचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले . काही काळ त्यांनी हळदव येथील आश्रमाची जबाबदारी पाहिली होती, त्यानंतर काही वर्ष मुखेड येथील आश्रमात तर दहा-बारा वर्ष नंदनवन येथे त्यांनी घालवली . नंतर ते आपल्या गावी जामगाव शिवनी येथे राहत होते .पण सोमवारी काही मानसिक ताण घेऊन दि17/2/2025 रोजी आपल्या रहात्या घरी कीटकनाशक घेऊन जिवन संपवण्याचे प्रयत्न केले . गावातील सर्व व्यक्तीने त्यांना ताबडतोब नांदेड येथे अपेक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र त्यांनी घेतलेली कीटकनाशक खूप विषारी असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान आज सकाळी सहा सात वाजता मृत्यूशी झुंजत असताना हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे गावातील तसेच वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Discussion about this post