चनाखा येथे शिवजयंती उत्साहात साजरी शिव व्याख्यान, नाट्य स्पर्धा व शोभायात्रेने वेधले लक्ष.
राजुरा 22 फेब्रुवारी
शिवमहोत्सव समिती चनाखा, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चनाखा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून पंचायत समिती राजुरा चे गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून चनाखा गावचे उपसरपंच राजेश सातपुते , डॉ. संदीप भटकर , मानसिक रोग तज्ञ वर्ग एक अधिकारी, डॉ. साची बंग ,मानसिक रोग तज्ञ कार्यक्रम अधिकारी, दुर्गा प्रसाद बनकर समुपदेशक, अतुल शिंदे ,मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते व सुरज बनकर कार्यक्रम सहाय्यक, उषा गजभिये अधिपरिचारिका, कुंदन देवळकर लेखापाल, रामेश्वर बारसागडे समुपदेशक आदींची उपस्थिती होती.
सकाळी ठीक सात वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनाखाचे विद्यार्थी व शिव महोत्सव समिती चनाखा सर्व सदस्य व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखाचे सदस्य यांच्या उपस्थित रॅली काढण्यात आली. घोड्यावर सवार शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत गावचे रहिवासी ज्ञानेश्वर साळवे हे घोड्यावर सवार होउन लक्षवेधक ठरले.
गावातील विद्यार्थ्यांचे भाषणे व नृत्य सादर करण्यात आली व संध्याकाळी शिवजयंती महोत्सव व शिव व्याख्यान तसेच नाट्य स्पर्धा घेण्यात आली . स्पर्धेला उद्घाटक म्हणून राजुरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व समस्त विद्यार्थी व गावकरी यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास देवाळकर यांनी सुद्धा विद्यार्थी व समस्त गावकरी यांना मार्गदर्शन केले.
शिवनाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आत्महत्या व त्याचे वाईट परिणाम या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधी यांच्या चमुने पटकविला तर द्वितीय क्रमांक मोबाईलचे वाढते व्यसन या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनाखा या शाळेने पटकविला तसेच तृतीय क्रमांक कौटुंबिक हिंसाचारांचा विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुनाळा या शाळेने पटकविला तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिव महोत्सव समिती चनाखा चे अध्यक्ष राहुल सातपुते, उपाध्यक्ष अमोल देवाळकर, सदस्य सुरज सातपुते, प्रमोद वडस्कर, शुभम सातपुते, बाळू वडस्कर, अंकित वडस्कर, संघर्ष रामटेके, लोकनाथ टेकाम, सुनील मडावी, विशाल साळवे, वैभव वडस्कर, तुषार सातपुते, ऋतिक देवाळकर, प्रीतम सातपुते तसेच समस्त चणाखा गावकरी उपस्थित राहून सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनाखा चे सहाय्यक शिक्षक संदीप कोंडेकर यांनी केले तर आभार वाटेकर यांनी मानले.
Discussion about this post