
वरोरा तालुका प्रतिनिधी : उमेश कोटकर
वारंवार अपघात होऊन सुद्धा कंपनी चे सुरक्षे कडे डोळेझाक शेवट शेगाव पोलीस यांनी लावले मातीच्या ढिघाऱ्या भोवती ब्यारिकेट त्यालुक्यातील वरोरा ते चिमूर ३५३ ई राज्य मार्गाचे काम अनेक वर्षा पासून सुरु असून अजून पर्यंत काम परिपूर्ण झाले नसल्यामुळे अनेकांनी जीव गमवला आहे. वरोरा ते चिमूर महामार्गचे काम सद्या के. सी. सी. कंपनीकडून सुरु असून दि. ९ फेब्रुवारी २०२५ रविवार रात्रोला सातच्या दरम्यान चारगाव धरणाजवळ मातीच्या धिगाऱ्यावरून दुचाकी वाहन गेल्याने चंदणखेडा येथील बाबा महादेव ठावरी अंदाजे वय वर्षे ६० यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर नत्थू कुंडलिक साळवे, रा काटवल भगत हे जखमी झाले होते. सविस्तर वृत्त असे कि गाडी क्र. एम. एच. ३४. सी. ई. १३७७ या दुचाकी वाहणाने बाबा ठावरी हे नातेवाईकातील तेरवीचा कार्यक्रमाला गेले होते. सायंकाळी कार्यक्रम आटोपून चंदणखेडा या आपल्या गावाकडे परत येताना चारगाव धरण रस्त्यावर मातीच्या धिगाऱ्यावर दुचाकी वाहन गेल्याने जागेवर पडून मृत्यू झालेला होता. के. सी. सी. कंपनीने मातीचे ढिगारे रस्त्यावर ठेवल्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांना रात्रीच्या सुमारास दुचाकी चालवताना त्रास सहन करावा लागतं आहे, सात ते आठ वर्षात या रस्त्याने अनेकांनी जीव गमावले असून अजून पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. वरोरा ते चिमूर ठीक ठिकाणी कोणत्याही प्रकारे कंपनीकडून बॅरिगेट लावण्यात आलेली नाही तसेच कित्तेक ठिकाणी सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघात होऊन कित्तेक नागरिकांना अपगत्व आले आहे. तसेच ठीक ठिकाणी सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा पडलेल्या असून अनेकांना दुचाकी वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे…रविवारी घडलेल्या या घटने नंतर सुद्धा के. सी. सी. कंपनीला कसल्याही प्रकारची जाग न आल्याने १० तारीख ला चिमुरला होणाऱ्या बालाजी यांचा रात घोडा यात्रेला जाणाऱ्या अन्य वाहणाला कुठला धोका होऊ नये यासाठी शेवटी शेगाव पोलीस यांनी tya मातीच्या ढिगाऱ्या भोवती ब्यारिगेटिंग करून स्वतःचे २ कर्मचारी रात्रभर तैनात केले होते.
Discussion about this post