शिरूर, तालुका प्रतिनिधी –
स्व. रसिकभाऊ धारिवाल यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, १ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.
प्रकाश भाऊ धारिवाल मित्र मंडळ, शिरूर शहर पंचक्रोशीच्या वतीने आयोजित या शिबिरासाठी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान हे जीवनदान असून, एका छोट्या कृतीतून कोणाच्याही जीवन वाचवता येऊ शकते. म्हणूनच, “रक्तदान हीच खरी मानवसेवा!” हा संदेश घेऊन अधिकाधिक रक्तदात्यांनी या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी सांगितले.
स्व. रसिकभाऊ धारिवाल यांच्या जयंती निमित्त समाजसेवेत सहभागी होऊन त्यांना मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मागील वर्षी प्रमाणे यंदावर्षीही रक्तदात्यांसाठी प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह व लकी ड्रॉ च्या माध्यमातून ८६ सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.
रक्तदान… श्रेष्ठदान…युवा पिढीला व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व प्रदूषण कमी व्हावे, सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी या रक्तदान शिबिरामध्ये सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

⏳ तारीख: १ मार्च २०२५
⏰ वेळ: सकाळी ७ ते सायंकाळी ६
📍 ठिकाण: शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय, शिरूर
📱संपर्क : 7775857629/9881214491 /9049202121
प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ, शिरूर शहर पंचक्रोशी

Discussion about this post