प्रतिनिधी :- प्रमोद जमादार (७७७५८८७१५३)
उमर्दा येथील कमलसिंग दारासिंग पावरा वय 19 वर्ष आपल्या मित्रासोबत काळापाणी गावात गेला असता तेथील अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडून जबर मारहाण करण्यात आली त्या मारहाणीत कमलसिंग दारासिंग पावरा या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या युवकाचा मृतदेह गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका नाल्याच्या कडेला फेकून देण्यात आला असे घटनास्थळी दिसून आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
तसेच काळापाणी येथे शवानपथक व ठसा तज्ञ सुद्धा पाचरण करण्यात आले. सदर घटनेची चौकशी करून घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे.
सदरच्या युवकास काळापाणी येथील एका घरात मारहाण करण्याचे निष्पन्न झाले आहे या घरात मिळून आलेल्या रक्ताचे डाग मारहाण करण्यात वापरण्यात आलेल्या काठी कुऱ्हाड विळा आधी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. उमर्दा येथील गेलेल्या युवकांना काळापाणी येथील काही अज्ञात व्यक्तींनी जबर मारहाण केली. या मारहाणीत कमलसिंग पावरा यांचा मृत्यू झाला या मारहाणीचा व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये अनेक लोक स्पष्टपणे मारहाण करीत असल्याचे आढळून आले ज्या युवकांना मारहाण केली त्या युवकांना कुठल्या कारणावरून मारहाण करण्यात आली याबाबतचे कारण अद्या स्पष्टपणे झाले नाही.
Discussion about this post