प्रतिनिधी :- नंदकुमार बगाडे
महाराणी येसूबाई राणीसाहेबांच्या ग्रंथांची तिसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देताना एक आगळावेगळा आनंद होतो आहे. आत्तापर्यंत माझी १२ पुस्तक प्रकाशित झाली आहेत. परंतु महाराणी येसूबाई या ग्रंथाएवढा आनंद आणि दुःख मला कोणत्याच ग्रंथातुन मिळाले नाही.मी कधीही कोणत्या ग्रंथाच्या सहवासात किंवा ऐतिहासिक पात्राच्या सहवासात फार काळ रमले नाही. परंतु येसुबाईं राणीसाहेबांचा ग्रंथ लिहीताना अस्वस्थता ,हुरहुर ,दुःख नेहमीच मनात दाटून येते. अशा संमिश्र भावना मनात असतानाच छावा चित्रपट दाखल झाला. या चित्रपटांमध्ये संभाजीराजांचा जीवनपट पाहिल्यानंतर वाचकांना महाराणी येसूबाई राणीसाहेबांची आठवण येणे सहाजिकच होते. बऱ्याच वाचकांनी मला महाराणी येसूबाई राणीसाहेबांच्या ग्रंथाची मागणी केली.मेहेता प्रकाशनाने हा ग्रंथ अल्पावधीतच रसिक वाचकांच्या हातात दिला त्याचा अतिशय आनंद होतो आहे.
या पुस्तकाला अतिशय सुबक व देखणे मुखपृष्ठ श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकार केले आहे.
तिसरी आवृत्ती हातात आल्यानंतर परत मनामध्ये भावनांचा कल्लोळ दाटुन आला आहे आणि एक अनामक हुरहूर मनामध्ये दाटून आली आहे.
रसिक वाचक नक्कीच या ग्रंथाचे स्वागत करतील.
मेहेता प्रकाशन आदरणीय श्री अखिल मेहता यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.
-डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर
Discussion about this post