



सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
सिदंखेडराजा तालुक्यातील दुसरबीड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात 18 पगड जाती व मुस्लिम बांधव यांनी मोठा सहभाग घेत साजरी केली सकाळी
छत्रपती कॉम्प्लेक्स समोर मंडप टाकून छत्रपतींची प्रतिमा ठेवण्यात आली व त्या ठिकाणी गावातील मान्यवर यांनी दिवसभर येऊन प्रतिमेचे पूजन केले. दुसरबीड येथील प्रथित यश डॉ. डी. एस. शिंदे
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर मामा ताठे भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ . दुसरबीडचे माजी सरपंच
प्रकाश सांगळे, सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव देशमुख, लोकजागकर परिवाराचे प्रवीण गीते, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख वैभव देशमुख, प्रतिष्ठित व्यापारी दिलीप देशमुख, सागर सांगळे, निवृत्ती वायाळ, वसंतराव उदावंत, मोगल साहेब, डॉक्टर वाघ, गजानन देशमुख, गजेंद्र देशमुख, भाजप शहराध्यक्ष सुधाकर मुंडे, जावेद भाई , प्रताप जाधव, दिलीप आतार, माजी उपसरपंच शेख नौशाद, सतीश खेडेकर, पत्रकार बाळासाहेब भोसले, संजय शिंदे, संदीप घुगे, शाळा समिती अध्यक्ष बंडू सांगळे, श्याम जाधव, प्रदीप शिंदे, शिवा बाबर, एकनाथ पवार, रवी बुधवत, विकास घुगे, अक्षय सांगळे, राहुल देशमुख, अभिजीत पाटील यांच्यासह गावातील मंडळी तरुण मित्र मंडळ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
Discussion about this post