
सिदंखेडराजा ..
तालुका प्रतिनिधी..
मातृ तीर्थ सिदंखेडराजाचे निर्भीड व निपक्ष पत्रकार प्रा. दिलीप नाईकवाड यांच्या तीन दशकातील पत्रकारितेची दखल घेत त्यांना बुलढाणा येथे गर्दे वाचनालयात मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रा. दिलीप नाईकवाड यांनी सिदंखेडराजा तालुक्यात १९९० पासून लोकमत वृत्तपत्रात सिदंखेडराजा तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तपत्रकारितेच्या माध्यमातून लेखणी हातात घेतली पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व लोकोपयोगी होते व आहे मराठी पत्रकार परिषदेचे सिंदखेडराजा तालुक्याचे सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा दिलेला आहे. मराठी पत्रकार परिषदेने याच कार्यक्रमात प्रा. दिलीप नाईकवाड यांच्यासह साखरखेर्डा येथील प्राचार्य डी. एन. पंचाळ सर व पत्रकार बाजीराव वाघ यांचाही शाल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन केंद्रीय आयुष मंत्री मा. प्रतापराव जाधव, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, एबीपी माझा चे व बायस्कोप मीडियाचे संपादक प्रसन्न जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार मान्यवरांना देण्यात आला .याप्रसंगी विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, बुलढाणा अर्बन चे भाईजी राधेश्याम चांडक मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह राजपूत यांच्यासह महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बुलढाणा जिल्हा कार्यकारी सदस्य व इतर मान्यवर यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती व्यासपीठावर होती. प्रा. दिलीप नाईकवाड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सिदंखेडराजा विकासाच्या दृष्टीकोनातून असलेला विकास आराखडा, वासनिक अहवाल, यावर सातत्याने लिखाण करून आपली एक वेगळी ओळख पत्रकारिता मध्ये निर्माण केलेली आहे. सिंदखेडराजा येथील सुरुवातीपासूनच्या जिजाऊ जन्मोत्सवात विविध पुरवण्या काढण्यासाठी पुढाकार घेणे, व पुरवण्यात लेखन करून प्रसिद्धी दिलेली आहे .गेल्या तीन दशकात सातत्याने त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक राजकीय, शेतकरी, शेतमजूर ,समाजातील वंचित घटक, तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक विषय यावर वृत्तपत्रातून लिखाण करत साक्षरता, पर्यावरण, पाणी प्रश्न, बेरोजगारी ,विविध राष्ट्रीय प्रश्न, अशा विविध विषयासह सर्व समाज घटकांना न्याय देत तालुका बातमीपत्रासह वृत्तपत्रातून विपुल लेखन करून प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. त्यांनी “तहानलेला सिदंखेडराजा”या सदरातून सिदंखेडराजा तालुक्यातील पाणी प्रश्न जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलेला आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात सुरुवातीला कोणत्याही प्रकारची साधने उपलब्ध नसताना वृत्तपत्र संकलन करून हाताने लिहून तासंनतास बस स्थानकावर उभे राहून बस गाडीची वाट पाहत हे वृत्त बुलढाणा येथे पोहोचवून मातृत्व सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच घटकांसाठी आपल्या लेखणीतून सर्वांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झिजवली तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी शासन यंत्रणा यावर पत्रकारिता चौथा स्तंभाचा नैतिक धाक निर्माण करून पत्रकारितेच्या तिसऱ्या डोळ्याची नजर आपल्यावर आहे . याची जाणीव पदोपदी मतदार संघात करून दिली पत्रकारितेतील निष्कलंक आणि निर्भीड पत्रकार म्हणून प्रा. नाईकवाड यांच्याकडे पाहिले जाते सुरुवातीला केवळ सहा ते सात पत्रकारांनी अतिशय कठीण काळात सिदंखेडराजा तालुक्यात पत्रकारितेचा भक्कम पाया उभा केलेला आहे. प्रा.नाईकवाड यांचे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्र व सांस्कृतिक कार्यातही मोठे योगदान आहे .
विजुक्टा या संघटनेचे तालुकाध्यक्ष ते जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, सत्य शोधक समाजाचे तालुकाध्यक्ष, शिक्षक आघाडीचे संस्थापक सदस्य, बुलढाणा जिल्हा अर्थशास्त्र विषयाचे उपाध्यक्ष व अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परीक्षेचे आयोजक भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे (अण्णा हजारे) गेल्या 25 वर्षापासून तालुकाध्यक्ष, मराठा सोयरीकचे तालुकाध्यक्ष, गडकिल्ले संरक्षण जिल्हा अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे व सध्या ही करत आहे. दुसर बीडमध्ये 1990 मध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक उपलब्ध नसतानां त्यांनी विविध ठिकाणच्या इंग्रजी विषयाच्या तज्ञ प्राध्यापक मित्रांना आपल्या घरी बोलून वर्ग भरून दुसरबीड च्या सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांनां मोफत शिक्षण देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. आजही शैक्षणिक क्षेत्रातील अडी, अडचणी, आणि समस्या याबाबतीत विद्यार्थ्यांनां ते आपले आधारवड वाटतात. सेवानिवृत्त अनेक शिक्षक प्राध्यापकानां समस्यांच्या बाबतीत ते आजही सहकार्य करून आपले सामाजिक दायित्व निभवत आहे . त्यांना मिळालेल्या पत्र योगी जीवनगौरव पुरस्काराबाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका सौ.अरुणा नाईकवाड यांचाही मोठा सहभाग असून त्यांचाही अनेक सामाजिक संघटनांनी घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आहे..
Discussion about this post