
भिवापूर : मनुवादी व्यवस्था प्रबळ होत आहे.
क्रिमिलेयरची
अट ओबीसीला मारक ठरणारी आहे.अशास्थितीत अनेक जाती व घटकामध्ये विखूरलेल्या ओबीसी समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी संघटीत होणे आवश्यक आहे. याकरीता समाज बांधवांनी वेळ काढून समाजाला जागरुक करुन ओबीसीचे संघटन बळकट करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष भैय्याजी लांबट यांनी मोतीराज भवनात झालेल्या शनिवारी (ता.२२) जेष्ठ पत्रकार पुरूषोत्तम भिसिकर यांचे अध्यक्षतेखालील ओबीसी सेवा संघाच्या सभेत केले.
यावेळी ओबीसी सेवा संघाचे कोषाध्यक्ष रमेश शहारे, पवनी तालुका अध्यक्ष उमाजी देशमुख, हाजी मोहम्मद नासीर, डॉ. वसंत खवास , माजी जि.प. सदस्य शंकर डडमल, माजी संचालक विजय वराडे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नारायण उदापूरे उपस्थित होते.भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष शहारे यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद केली.संघाचे संस्थापक अध्यक्ष अडव्होकेट प्रदीप ढोबळे ( मुंबई ) यांनी व्हिडीओ कान्फ्रसिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. अध्यक्षीय व्यासपीठावरून भिसिकर म्हणाले की, ओबीसी समाजानी आपल्या हित रक्षणासाठी संघटीत होणे ही आजची खरी गरज आहे..
कार्यक्रमाला बाबा माळवे, गजानन राऊत, वसंता ढोणे, विजय लांजेवार, अमोल कोल्हे, भानुदास पाल, किशोर लकडे, अधिकरण तिडके , अनील वांढरे,
सुधाकर वराडे, प्रकाश वराडे, पुंडलीक जळीत, जगदीश हजारे, संदीप वराडे ,रमेश कुंभारे आदींसह नागरिक उपस्थित होते..
Discussion about this post