भिवापूर :
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीसाठी नोंदणी केली.मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळाली नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करुन त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनांची कार्यक्षमतापूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी शेतकरी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सी.एस.सी सेंटर,ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक व ग्राम विकास अधिकारी, आपले सरकार सेवा केंद्र व सर्व सेतू कार्यालयात जाऊन नोंदणी करीत आहेत.यामुळे पीएम किसान योजना, शेतकरी कर्ज वितरण,पिक विमा योजना,पीक हमीभाव खरेदीसाठी मदत, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण,महाडीबीटी वरील कृषी विभागाच्या सर्व योजना,केंद्र व राज्य शासनाच्या कृषी बाबतच्या सर्व योजना मिळण्यास मदत होणार आहे.मात्र फार्मर आयडीसाठी सीएससी केंद्रावर नोंदणी करून जवळपास एक महिना लोटूनही मंजुरी (अप्रोवल) न मिळाल्याने योजनेविषयी शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
( काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली.परंतु वेगवेगळ्या गावी शेतजमीन असल्यास,त्या शेतीला सुध्दा आधार संलग्न करायचा आहे.काहींनी एका भुमापन क्रमांकाशी आधार जोडला व दुसऱ्या गटांशी जोडला नाही.त्यामुळे मंजुरी दिली नाही.१ मार्चपासून मंजुरी देण्यास सुरुवात केली जाईल.
सुनिल जा.मुंढरे ,तलाठी ,मोखाळा साझा क्र.७९-अ )..
Discussion about this post