नवीन नांदेड – (प्रतिनिधी)
महाशिवरात्री निमित्ताने 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12वाजे पासून ते दिवसभर तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी नांदेड येथे पंचक्रोशीतील लाखोभाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता,तर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने भाविक भक्तांना दर्शन सुलभ झाले होते, विष्णुपुरी येथे चहा फराळ ,फळे पाणपोई व्यवस्था गावातील सामाजिक कार्यकर्ते व गावकरी यांनी केली होती,सायंकाळी खासदार अशोकराव चव्हाण व आमदार सुजया चव्हाण यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी दर्शन घेतले.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे 26 फेब्रुवारी रोजी महाअभिषेक , नोंदणी पध्दतीने महाअभिषेक, महाआरती,भजन संध्या यासह मंदिर परिसरात 20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे ह.भ.प. शैलेश महाराज कामठेकर यांच्ये काल्याचे किर्तन होणार आहे.
26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजता पुजारी सतिश महाराज, शिवलिंग धनमणे,अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर ,
काळेश्वर मंदिर संस्थान व विश्वस्त समिती यांच्या हस्ते श्री काळेश्वर भगवानचा महाअभिषेक तसेच रात्री ते पहाटे या वेळेत इतर सर्वांचे नोंदणी पद्धतीने अभिषेक करण्यात आले,
संगीत भजन रात्री 11 ते पहाटे आयोजित करण्यात आले होते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण,आमदार सुजया चव्हाण व जया चव्हाण,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे
माजी आमदार मोहनराव हंबर्डे,धारोजी हंबर्डे यांच्या सह विष्णुपुरी ग्रामपंचायत सरपंच सौ संध्या विलास हंबर्डे, उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे व ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी दर्शन घेतले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी बारा अधिकारी,पन्नास पुरुष महिला पोलीस कर्मचारी, पुरूष महिला होमगार्ड यांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त,व नदीकाठ किनारावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते.
विष्णुपुरी मुख्य मार्गावर शहर वाहतूक शाखा, पोलीस अंमलदार,होमगार्ड यांच्या अनेक ठिकाणी बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था केल्याने भाविक भक्तांना दर्शन सुलभ झाले, महाशिवरात्री निमित्ताने ग्रामीण व शहरी भागातील विविध खेळणी, महाप्रसाद यासह अनेक दुकाने थाटली होती तर आकाश पाळणे दुकाने लावण्यात आली होती. मुख्य मार्गावर विविध ठिकाणी गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पदाधिकारी यांनी फळे फराळ चहा पाणी व्यवस्था केली होती यावेळी अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला.
महाशिवरात्री यात्रे निमित्ताने भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहता व सुलभ सोयीस्कर होण्यासाठी काळेश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, सचिव शंकरराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे सदस्य मोहनराव हंबर्डे,रावसाहेब हंबर्डे, धारोजीराव हंबर्डे,गणेश धनमणे, बालाजीराव हंबर्डे,सतिश भेंडेकर यांच्या सह माजी सरपंच राजु हंबर्डे व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मंदिर परिसरात दर्शन रांगा नियोजन बद्ध लावण्यात आल्या होत्या,महसूल विभागाच्या वतीने मंदिर परिसरातील पाहणी मंडळ अधिकारी कानगुले यांनी केली. दिवसभर पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी
व अनेकांनी गोदावरी स्नान करून दर्शन घेतले.
Discussion about this post