उदगीर /कमलाकर मुळे: महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन उद्या दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अहमदपुर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार असल्याची माहिती सत्कार समारंभ समितीच्या वतीने देण्यात आली. येथील महात्मा गांधी कॉलेजच्या मैदानावर सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा दिव्य भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले ,असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले हे राहणार असून ,या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे व माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड ,आमदार अभिमन्यू पवार, शेजारील गंगाखेड- पालम विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे, लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, गोपाळराव माने ,डॉक्टर अफसर शेख, बाबासाहेब कांबळे ,हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभ पूर्वी सकाळी विविध विकास कामाचे भूमिपूजन मान्यवराकडून होणार आहे .उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अहमदपूर मतदारसंघावर फार उपकार असून नामदार बाबासाहेब पाटील यांच्या साठी केवळ मंत्रिपदाची मागणी केली होती .पण त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच तालुक्याला कॅबिनेट व तेही महत्त्वाचे सहकार खाते दिले आहे .त्यामुळे हा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे. हा सत्कार सोहळा महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
Discussion about this post