आदिवासी गोंड गोवारी समाजा तर्फे भव्य सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
गोंडपिपरी:दि. २३ नोव्हेंबर १९९४ ला टि पाईंट झिरो माईल्स नागपूर मध्ये समाजाच्या न्याय हक्काच्या मागणी करीता जमलेल्या गोंड गोवारी जमात बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्या मध्ये समाजातील ११४ व्यक्ती शहीद झाले.त्यांची आठवण सदोदित राहावी, आणि आपल्या मागण्या कित्येक वर्षापासून पूर्ण झाल्या नाही समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला शहीद वीरांचे स्मरण झाले पाहिजे, या निमित्ताने त्यांना श्रध्दांजली अर्पन करण्याकरीता आदिवासी गोंड गोवारी जमात शहीद स्मारक अनावरण सोहळा तथा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दि. २ फेब्रुवारी रोजी चेक लिखीतवाडा येथे आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटक मा. रामदास नेवारे राज्यसचिव आदि. गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृति समिती (म. रा.), कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन कोहळे जिल्हा अध्यक्ष आदि. गोंड-गोवारी जमात संस्कृती कायाण मंडळ चंद्रपूर, प्रमुख मार्गदर्शक गजानन चामलाटे कार्याध्यक्ष गोंड-गोवारी जमात संस्कृती कायाण मंडळ चंद्रपूर (कार्यालयीन मार्गदर्शक),डॉ. पुर्णानंद नेवारे उपाध्यक्ष आ.गों. गो. संस्कृतिक कल्याण मंडळ, चंद्रपूर शाखा गडचिरोली हे राहणार आहेत.
या प्रसंगी समाजाच्या चळवळीत सिंहाचा वाटा असणारे आणि न्याय हक्कासाठी लढा देत उपोषण करणारे किशोर चौधरी वर्धा,सचिन चचाणे यवतमाळ,चंदन कोहरे बुलडाणा या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. करिता समस्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे अशी गोंडपिपरी तालुका गोंड गोवारी आदिवासी समाज अध्यक्ष सतिश नेवारे व समस्त आदिवासी गोंड गोवारी जमात संयोजक मंडळ चेकलीकीतवाडा यांनी केले आहे.
Discussion about this post