पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी.
पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयात दि.27फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला . यावेळी मराठी विभागाच्या वतीने॓’ मराठी व हिंदी भाषा एक अनुबंध’ या विषयावर प्राध्यापक डाॅ.एम .यु.खेडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. डॉ. खेडेकर यांनी मराठी व हिंदी या इंडो यूरोपियण भाषा वंशातील भाषा असून त्यांचा शब्दसंग्रह, व्याकरण व रूप व्यवस्था यामध्ये कमालीचे सारखेपणा आहे असे त्यांनी प्रतिपादन केले .यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर एस.टी . सामाले ,मराठी विभाग प्रमुख डॉ. जी.जे.मोरे व प्रो. डॉ.ए.जी. इजेगावकर उपस्थित होते .मान्यवरांच्या शुभहस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. मोरे जी जे यांनी केले आभार व सूत्रसंचालन प्राध्यापक ठोंबरे एम डी यांनी केले .यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post