परभणी, ता. २७: पंचायत समिती पाथरी येथे गटविकास अधिकारी आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. झरी ग्रामपंचायत अंतर्गत ७ विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५,००० रुपयांची लाच घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही सापळा कारवाई करण्यात आली.
अटक आरोपी:
1️⃣ ईश्वर बाळू पवार (वय ५६) – गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथरी
2️⃣ गोवर्धन मधुकर बडे (वय ३०) – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पंचायत समिती पाथरी
घडलेला प्रकार:
तक्रारदाराने ७ विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी अर्ज केला होता, मात्र आदेश मिळवण्यासाठी प्रति विहीर ५,००० रुपये लाच मागितली जात असल्याची तक्रार दाखल केली होती. पडताळणी दरम्यान ईश्वर पवार यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
सापळा आणि अटक:
🔹 तक्रारदार लाच देण्यासाठी पंचायत समितीत गेल्यावर गोवर्धन बडे यांनी पैसे स्विकारले, आणि ते ईश्वर पवार यांच्या सांगण्यावरून घेत असल्याचे स्पष्ट केले.
🔹 ACB पथकाने ३५,००० रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
🔹 आरोपींच्या अंगझडतीत ८,००० रुपये अतिरिक्त रोख रक्कम सापडली.
🔹 घरझडतीत ईश्वर पवार यांच्या घरातून ६३,००० रुपये रोख जप्त करण्यात आले.


पुढील कारवाई:
📌 पोलीस स्टेशन पाथरी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
📌 दोघांचे मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू
📌 घरझडती दरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंग केले
सापळा रचणारे अधिकारी:
👮 अल्ताफ मुलाणी – पोलीस निरीक्षक, ACB परभणी
👮 बसवेश्वर जकीकोरे, ASI निलपत्रेवार, पोह. रवींद्र भूमकर व अन्य ACB पथक
मार्गदर्शक अधिकारी:
📌 संदीप पालवे – पोलीस अधीक्षक, ACB नांदेड
📌 डॉ. संजय तुंगार – अप्पर पोलीस अधीक्षक, ACB नांदेड
🔹 तक्रार करण्यासाठी:
📞 टोल फ्री: 1064
📱 व्हॉट्सॲप: 9272111064
🏢 संपर्क कार्यालय: 02452-220597
Discussion about this post