प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
परभणी, दि. 28/02/2025. 1008 भगवान महावीर स्वामी यांचे 2550 निर्वाण वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परभणी जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
खुशी सचिन मुथा, स्कॉटीश अकादमी, कल्याणी प्रेमसुख बोराळकर, श्रीमती शंकुतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय जिंतूर, करण उधव गलबे, जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळा पाथरी, प्रगती परमेश्वर इंगळे, दुर्गा गजानन मगर, मानसी प्रेमसुख बोराळकर, श्री संचारेश्वर जिंतूर, सात्विक संतोष मेहत्रे, न्यू ओयासीस इंग्लिश स्कूल परभणी, अनुजा ग्यानोबा बोबडे, सुशांत मुंजाजी तरवटे, जि. प. प्राथमिक शाळा बोरवंड, संस्कृती विद्यानिकेतन प्रायमरी इं. स्कूल परभणी, हनुमान मुरलीधर बुरसे, अभिनव विद्या विहार प्रशाळा पुर्णा यांचा समावेश होता. स्वस्ती दिनेश काला या विद्यार्थिनीचा या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि श्री. गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच निरांत उदगीरकर याचांही सत्कार करण्यात आला. मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करताना या बक्षिसाचा उपयोग व्हावा. पालकांवर शैक्षणिक खर्चाचा भार पडू नये, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.



यावेळी बोलताना श्री. गांधी म्हणाले की, भगवान महावीरांचे अनेकांतवादाचे विचार सामाजिक आणि जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आजही जगाला ते मार्गदर्शक ठरत आहेत. इथे राज्यातील 16 लक्ष विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यात सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी जैन समूहाकडून शाळा चालविल्या जातात. यावेळी त्यांनी उद्योगपती स्व. रतन टाटा यांचेही उदाहरण देत शाळांची गुणवत्ता सातत्याने राखण्याचे आवाहन श्री. गांधी यांनी केले. तसेच जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, विकासासाठी, त्यांच्या निवासी वसतिगृहासाठी योग्य तो निधी मिळवून देण्याचे आवाहन केले.
राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याबद्दल विद्यार्थ्याचे कौतुक केले. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करून निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post